माहिती संग्रह | देणगी

गणेश स्थापना संपूर्ण विधी

भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते. या दिवशी घरी गणपतीची मूर्ती आणून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. आपल्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अथवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती घरी बसवले जातात. दररोज सकाळ- संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. दररोज एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते, लाल फुलं अर्पित केलं जातं. गणपतीला नैवेद्य दाखवतात.

गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत या दिवशी गणपती घरी आणावा. घरी दारात आल्यावर सुहासिणीने भाकर तुकडा ओवाळून टाकावा आणि गणपती आणणार्‍याच्या पायावर पाणी घालावे. गणपती आसनासमोर खाली ठेवून शास्त्रोक्त पूजा करावी. तर चला जाणून घेऊया संपर्ण पूजन विधी मंत्रोच्चारासह.