मुखपृष्ठ / दान

|| श्री स्वामी समर्थ ||

श्री स्वामी समर्थ (अक्कलकोटचे स्वामी) हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. ते १९ व्या शतकात होऊन गेले. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. 'वटवृक्षापासून' आपला जन्म झाल्याचे सांगणाऱ्या या अवधूत संतांनी अनेक लीला व चमत्कार करून अज्ञान दूर केले आणि भक्तांना आशीर्वाद दिले.

श्री स्वामी समर्थांचे मूळ आणि बालपण अज्ञात आहे. असे मानले जाते की गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच अनेक शतकांच्या तपश्चर्येनंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी भारतभ्रमण केले, हिमालय, द्वारका, पुरी, काशी, रामेश्वरम अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. शेवटी ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि त्यानंतर अक्कलकोट येथे स्थायिक झाले

सन १८५६ मध्ये ते अक्कलकोट येथे आले आणि तब्बल २२ वर्षे येथे राहिले. ते बहुतांश वेळ चोलप्पा नावाच्या शिष्याच्या घरी राहत असत. त्यांनी अक्कलकोटचे राजे शहाजीराजे (बाळासाहेब) भोसले यांच्यासह अनेकसामान्य भक्तांना दिव्य अनुभूती दिली. स्वामी नेहमी दिगंबर (अवधूत) स्वरूपात असत.

स्वामींच्या कथा

स्वामींच्या कथा

# कथा वाचा
1 संतांची सर्वज्ञता
2 ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरुकृपेने गेले !
3 स्वामींनी गणपतची परीक्षा का घेतली?
4 श्री स्वामी समर्थ प्रकट कथा

ऑनलाईन अभिषेक बुक करा

अभिषेक रजिस्टर करा
अभिषेक -रु.१०१
अभिषेक -रु.२०१
अभिषेक -रु.५०१
अभिषेक -रु.१००१
अभिषेक -रु.५००१