माहिती संग्रह | देणगी

आरती शुक्रवारची

जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥ स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्‌वृत्ती ॥ व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥ सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥ पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥ ह्मणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥

ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥जयदेव० ॥२॥ सकळा देवामाजि तूं वक्रतुंड ॥ दोष छेदन कानीं होसी प्रचंड ॥ ध्यानीं अवलोकितां पूर्ण ब्रह्मांड ॥ शास्त्रादिक शोधितां निगमागम कांड ॥जयदेव० ॥३॥ सुखदासन मनमोहन फणि भूषण धारि ॥ हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥ मयुर वाहन पावन नयन त्रिधारी ॥ सादर वरद भक्तां होय विघ्नहारी ॥जयदेव० ॥४॥ गुरुवर कृपें योग दिसे अभेद ॥ पाहातां सर्वांठायीं हा मूळकंद ॥ पठण करितां योगीं निज चतुर्वेद ॥ विनवी चिंतामणी निजभावें वरद ॥जयदेव० ॥५॥