माहिती संग्रह | देणगी

आरती बुधवारची

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥ सहस्त्रवदनें शेष वर्णिंता झाला ॥

नकळे तुमचा महिमा स्तवितां श्रमला ॥ मौन धरुनि वेद श्रुति परतल्या ॥ तोचि (हाचि) मोरेश्वर विश्वंभरीं अवतरला ॥जयदे० ॥२॥ कोटि सूर्य प्रकाश कोटि (शशि) निर्मळ ॥ सर्वात्मा सर्वांजीवीं जिव्हाळा ॥ मोरया गोसावी पाहे अवलीला ॥ देव भक्त प्रेमें घेति सोहळा ॥ जयदेव० ॥३॥