स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे
स्वामी समर्थ तारक मंत्राच्या सुरुवातीच्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मना रे असे म्हटलं गेलंय. या ओळीचा अर्थ स्वामींची भक्ती करताना भक्तांनी मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील सर्व भीती दूर करुन त्यांना अंतःकरणापासून समर्पित व्हायचे आहे. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की स्वामी भक्तांनी सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामी समर्थांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा श्री स्वामी समर्थ पूर्ण करू शकतात.
स्वामी समर्थ तारकमंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्यापाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीज गरज नाही. श्री स्वामी समर्थ सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविणा काळ देखील तुम्हाला काही करु शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत.
तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ तर श्री स्वामी शक्ती आहे. जन्म-मृत्यू ज्यांच्या आधीन आहेत ते ब्रह्मांडनायक स्वामी तुझे आहेत तू त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामी समर्थांची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते.